देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील  पोस्ट खात्यात (डाक सेवा)3650 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना ही नोकरी  मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.या संबंधीची अधिकची माहिती indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे अर्जासंबंधी तसेच पदासंबंधी सविस्तर माहिती पोस्ट खात्याच्या अधिकृत  संकेत स्थळावर उपलब्ध आहे. पात्र ठरल्यानंतर उमेदवाराला कमीत कमी १० हजार रुपये तर जास्तीत जास्त १४ हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय पोस्ट सेवा विभागातील ब्रांच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांची भरती केली जाणार आहे.

१८ वर्ष पूर्ण करणारा किंवा जास्तीत जास्त ४० वर्ष पूर्ण केलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात तो उत्तीर्ण असल्यास उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याचेही जाहिरातीत म्हटले आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या दहावीतील गुणांच्या आधारावर यादी तयार केली जाणार असल्याचेही यात म्हटले आहे. इच्छूक उमेदवार पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in किंवा appost.in/gdsonline वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2019 

Link http://app

ost.in/


Comments

Popular posts from this blog

Registar Rent Agreement / Leave and Licence

नाव बदल राजपत्र (gazette)