(RTE 25% ADMISSION 2026) आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया -
RTE म्हणजेच शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात.
RTE Admission 2025- 26 : आपण आतापर्यंत RTE शब्द बऱ्याचदा ऐकला असेल पण त्याचा नेमका अर्थ प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही. आरटीईचा फुल फॉर्म - Right To Education म्हणजेच शिक्षणाचा अधिकार असा होय. हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 नावाने ओळखला जातो. भारतीय संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा पारित केला आहे. आता या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात 2024-25 सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
RTE अधिनियमा अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्यासाठीची प्रक्रिया राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. RTE अधिनियमानुसार 25% जागा खासगी शाळेतील प्रत्येक वर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
| प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | |
| किमान वय | कमाल वय | |
| प्ले ग्रुप/नर्सरी | 3 वर्ष | 4 वर्षे 5 महिने व 30 दिवस |
| ज्युनियर केजी | 4 वर्ष | 5 वर्षे 5 महिने व 30 दिवस |
| सिनियर केजी | 5 वर्ष | 6 वर्षे 5 महिने व 30 दिवस |
| इयत्ता १ ली | 6 वर्ष | 7 वर्षे 5 महिने व 30 दिवस |
👉 प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?
- वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत वंचित घटक व दुर्बल घटकातील मुले-मुली यासाठी अर्ज करू शकतात.
- वंचित घटक : वंचित घटकात दिव्यांग विद्यार्थी (वंचित घटकांमध्ये समाविष्ट प्रवर्ग, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती (A), भटक्या जमाती (B), भटक्या जमाती (C), भटक्या जमाती (D), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित / प्रभावित बालक, अनाथ बालक, दिव्यांग बालक, कोविड प्रभावित बालक) या सर्व मागास प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- आर्थिक दुर्बल गट (EWS) : वरील समाजघटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गांचा समावेश दुर्बल गटात होऊ शकतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
👉 शाळा निवड
- निवासस्थानापासून 1 किमी किंवा कमी अंतरावरील शाळा पोर्टलवर दिसतील
- विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी
👉 अंतर निश्चिती (Google Map)
- घर ते शाळा हवाई अंतर Google Map ने निश्चित होईल
- लोकेशन मार्क (बलून) जास्तीत जास्त 5 वेळा बदलता येईल
- अचूक लोकेशन नमूद करणे आवश्यक
👉 अर्जांची निवड कशी होते?
- प्राप्त अर्जांची निवड ऑनलाईन स्वरुपातच लॉटरी पद्धतीने होते
- लाभार्थी हा अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितकं जास्त जवळ तितकी अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते.
📄 आवशयक कागदपत्रे :
लवकरच शैक्षणिक सत्र 2025-26 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड अनिवार्य पालकांचे (आई किंवा वडील) (अनाथ बालक असल्यास त्यांचे संगोपन करणाऱ्या पालकांचे आधार कार्ड)
- बालकाचा जन्म दाखला व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य) भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी (दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा आवश्यक)
- जात प्रमाणपत्र (सामाजिक वंचित घटकांसाठी)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) (परराज्यातील जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही)
- आर्थिक दुर्बल घटक (EWS) साठी (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असलेला उत्पन्न दाखला) (सन 2023-24 किंवा 2024-25 पैकी कोणत्याही वर्षाचा)
📄 कागदपत्रा विषयी विस्तृत माहिती
आधारकार्ड (आई किंवा वडील) असणे आवश्यक आहे, बालकांचे आधारकार्ड नसल्यास अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. बालकांचे आधारकार्ड निर्धारित कालावधीत सादर न झाल्यास RTE 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल.
• जन्म तारखेचा पुरावा (ग्रामपंचायत / मनपा / नपा यांचा दाखला / रुग्णालयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला / अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला)
• सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास (तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा (वडीलांचा / बालकांचा) जातीचा प्रमाणपत्र. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही)
• वार्षिक उत्पन्नाचा दाखला (आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील बालकासाठी) विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष सन 2023-24 किंवा सन 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला.
• वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा (दिव्यांग बालक असल्यास) जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
• निवासी पुरावा : आपण निवडलेल्या शाळेच्या कार्यक्षेत्रात स्वतःचे घर असल्यास खालीलपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य:
रेशन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्ड / वीज बिल / टेलिफोन बिल / प्रॉपर्टी टॅक्स बिल / घरपट्टी / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक
• भाडेकरार संबंधित नियम
- स्वतःचे घर नसल्यास नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य
- भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा
- अर्ज भरण्यापूर्वीचा असावा
- किमान 11 महिन्यांचा किंवा अधिक कालावधीचा असावा
- पडताळणीत दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल
• अनाथ बालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे :
- अनाथालय / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.
- जर बालक अनाथालयात राहत नसेल तर सांभाळ करणाऱ्या पालकांचे हमीपत्र आवश्यक राहील.
- अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे जसे वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
• घटस्फोटीत महिला पालक असल्यास :
- न्यायालयाचा निर्णय
- घटस्फोटीत महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा
- बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व आर्थिक दुर्बलतेचा पुरावा
📅 ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2026 ही ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख राहील.
आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे. फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा.

Comments
Post a Comment