(RTE 25% ADMISSION 2026) आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया -
RTE म्हणजेच शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. RTE Admission 2025- 26 : आपण आतापर्यंत RTE शब्द बऱ्याचदा ऐकला असेल पण त्याचा नेमका अर्थ प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही. आरटीईचा फुल फॉर्म - Right To Education म्हणजेच शिक्षणाचा अधिकार असा होय. हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 नावाने ओळखला जातो. भारतीय संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा पारित केला आहे. आता या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात 2024-25 सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे . RTE अधिनियमा अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्यासाठीची प्रक्रिया राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. RTE अधिनियमानुसार 25% जागा खासगी शाळेतील प्रत्येक वर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा किमान वय ...